राज्यपाल व त्रिवेदीं यांच्या वक्तव्याचा अमळनेरात जोडे मारो आंदोलन
खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधाशु त्रिवेदी याने छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला पाच माफीनामे लिहिले तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याने छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने या दोघांचा आज दुपारी अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे निषेध करण्यात आला.
भाजपाचा राष्ट्रीय प्रवक्ता सुधाशु त्रिवेदी, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत तिव्र निषेध व्यक्त केला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, महिला आघाडी उप जिल्हा प्रमुख मनिषा परब माजी नगरसेक दादा पवार,अनंत निकम,महिला आघाडी शहर प्रमुख उज्वला कदम, गीताबाई टेलर, छाया कदम,मोहन भोई, बाळासाहेब पवार, मयूर पाटील, रामचंद्र परब नाना ठाकूर, शेख सखर आदी यावेळी उपस्थित होते
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम