ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्स नावाचे दुकान फोडणारा अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे रा. पावर हाउस जवळील झोपडपट्टी जळगाव, असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी यांच्या मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवीली की,सराफ बाजार जळगाव येथिल मनिष ज्वेलर्स याचे दुकान फोडुन सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरी झालेले असून ती चोरी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे. अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली. त्यानुसार पोउपनिरीक्षक अमोल देवढे पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अकरम शेख, अशरफ शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्था. गु. शा, अशांना आदेश दिल्याने सदर पथकाने प्रिंप्राळा हुडको येथून ताब्यात घेतले. त्यास व त्याचे रेकॉर्डवरील ०३ अल्पवयीन साथीदार रेकॉर्डवरील निषपण्णकरून आरोपी नामे विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे वय – २७ रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव यांस गुन्हयाकामी ताब्यात घेतले आहे सदर गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like