खासगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून १ लाख १४ हजार ६२९ रुपयांची लूट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | बचत गटाचे पैसे वसूली करणाऱ्या खासगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार विटनेर गावाच्या रस्त्यावर घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात एनबीएफसी या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून सुनील शेषराव पाढाळे (वय-२६) औरंगाबाद ह.मु. हिवरखेडा रोड जामनेर हे नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमले आहे.त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून पैसे वसूलीचे काम करतात. सुनील पाढाळे हे मंगळवारी (दि. २२) मार्च रोजी कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकी क्रमांक एमएच २० डीजे १६६० वरून गेले.

पाच महिलांकडून एकूण ९५ हजार ८७३ रुपयांची वसुली करून वरडमार्गे विटनेरकडे दुचाकीने निघाले. दुपारी वराड आणि विटनेर गावाच्या रस्त्यावर असलेल्या रस्त्याने जाताना अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग करत आले. पुढे सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे गेले. तिघे दुचाकी समोर अचानक आल्याने सुनील यांनी अचानक ब्रेक लावला व ते खाली पडले. हनामारी करत त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. त्यावेळी सुनील यांनी याला विरोध केला असता त्यातील एकाने कमरेतून पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावली.

धमकी देत “बॅग सोड नाहीतर गोळी मारेल”. पैश्यांची बॅग जबरी हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या बॅगमध्ये ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील पाढाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like