जिवनात कामासोबत खेळही महत्वाचे-  कैलास हुमणे

बातमी शेअर करा

राज्य स्पर्धेसाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा निवड चाचणी

 

खान्देश लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I जिवनात कामासोबत खेळही महत्वाचे आहे; त्यामुळे निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रिडापटूंनी खेळाला खेळ म्हणून खेळण्याचे आवाहन मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ कैलास हुमणे यांनी केले.

 

एकलव्य क्रिडा संकुल जळगाव येथे पार पडलेल्या नाशिक-जळगाव आंतरपरिमंडलीय क्रिडा निवड चाचणी स्पर्धेच्या उध्दाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता राजेंद्र मार्के, धुळे मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता भिमराव मस्के, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता कैलास जमदाडे, जळगाव परिमंडळाचे सहाय्यक महाव्यस्थापक (मासं) नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी अरुण शेलकर, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी नाशिक परिमंडळ प्रमोद राजेभोसले, का.अभि. चाळीसगाव विभाग संदिप शेंडगे, का.अभि. भुसावळ विभाग प्रदिप घुरड, का.अभि. जळगाव विभाग व्हि.बि.पाटिल, का.अभि. सावदा विभाग गोरक्षनाथ सपकाळे, का.अभि. प्रशासन जळगाव धमेंद्र मानकर, का.अभि. चाचणी कक्ष जळगाव प्रदिप सोरटे, का.अभि. संगमनेर विभाग अनिल थोरात, का.अभि. धुळे ग्रा. विभाग धनंजय भामरे, जनसंपर्क अधिकारी नाशिक परिमंडळ विकास आढे, व्यवस्थापक (मासं) नाशिक मंगेश गाडे व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मुख्य अभियंता कैलास हुमणे म्हणाले की, जळगाव येथे होत असलेली राज्यस्तरीय निवड चाचणी असल्याने यामध्यमातुन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन सर्व क्रिडापटूनी आपले उत्तम योगदान देण्याचे आवाहन करत सर्व क्रिडापटूंना शुभेच्छा दिल्या.

 

जळगाव येथे पार पडलेल्या नाशिक-जळगाव आंतरपरिमंडलीय क्रिडा स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक, असे एकून 12 क्रिडा प्रकाराचा समावेश असून या निवड चाचणीसाठी जळगाव व नाशिक परिमंडळातील एकून 148 स्पर्धक सहभागी झाले आहे.

यावेळी स्पर्धेची औपचारीकरित्या उध्दाटन करतांना मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ कैलास हुमणे व उपस्थित मान्यवर नाशिक-जळगाव परिमंडळ यांच्या दरम्यान कबड्डी, क्रिकेट, बॅटमेंटन, टेबल टेनिस ,रनिंग तसेच कॅरम सामना खेळत स्पर्धकात उत्साह भरण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व क्रिडा प्रकाराला भेटी देत क्रिडापटूंना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like