पेजो रिक्षा व मोटार सायकल यांचा समोरासमोर अपघात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | अमळनेर येथून शाळेतून रिक्षाने घरी जात असताना रंजाणे-अंतुर्ली रस्त्यावर पेजो रिक्षा व मोटार सायकल यांचा समोरासमोर अपघात झाल्याने शाळकरी मुले जखमी झाले आहेत.

 

आमोदे ता. अमळनेर येथील विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी अमळनेर येथे येतात .21 रोजी दुपारी शाळा सुटल्यावर आमोदे येथे घरी जात असताना रंजाणे-अंतुर्ली रस्त्यावर पेजो रिक्षा एम एच 18 ऐ 2380 क्रमांकाची व मोटार सायकल यांचा समोरासमोर अपघात झाल्याने यात शाळकरी मुले जखमी झाले आहेत.

यात आमोदे येथील डी आर कन्या शाळा अमळनेर इयत्ता आठवीची विध्यार्थिनी माधवी किशोर पाटील जबर जखमी झाली असून तिचे पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून हातही फ्रॅक्चर झाला आहे तर चेहऱ्यावर जखम झाल्या आहेत. तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला ताबडतोब धुळे येथे खाजगी रुग्णालयात हलविले आहे.

तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला अत्यावश्यक वार्ड मध्ये दाखल केले असून उपचार सुरु आहेत.तर मोटार सायकल चालक हाही जखमी झाला असून तो पिगळवाडे येथील असल्याचे समजते. त्यांना ही धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like