राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले जळगावकर !

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ |  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून राष्ट्रीय एकता दौड रॅली सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता काढण्यात आली.या रॅलीत जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यालया उजाळा दिला . जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रीय एकता दौड रॅलीला सुरूवात करण्यात आली.

राष्ट्रीय एकता दौड रॅलीत महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक एस.राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त अविनाश बाविस्कर, क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, यांच्यासह महापालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व खेडाळू मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय एकता दौड ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर कोर्ट चौक, बेंडाळे महिला महाविद्यालय, नवीन बसस्थानक पर्यंत काढण्यात येवून तिथेच समारोप करण्यात आला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like