जिल्ह्यातील ६ लाख लाभार्थ्यांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी किट
खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | राज्य शासनाने रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट ) शंभर रुपयांत शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६ लाख २० हजार ६५० शिधापत्रिकांसाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शिधाजिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळी पूर्वी जाऊन ई- पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे. तसेच रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नसंच घेतल्याची पावती घेऊन संचात ४ पाकीट असल्याची खात्री करावी. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम