जळगावच्या नयन आंबोडकर सीताज्योतिष भास्कर ॲवार्डने सन्मानीत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १३ मे २०२२ । नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चतुर्थ ज्योतिष महाकुंभात येथील नयन आंबोडकर यांना सीताज्योतिष आंतरराष्ट्रीय ज्योतिष परिषदेच्यावतीने सीता ज्योतिष भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सीता ज्योतिष आणि वास्तू संशोधन केंद्र, जोधपूर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील १५१ प्रतिभावंतांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जळगाव येथील ज्योतिष हिलर म्हणून काम करणाऱ्या नयन आंबेकर यांना त्यांच्या ज्योतिषशास्त्रातील विशेष सेवेबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

ज्योतिषाचार्य हीलर नयन आंबोडकर या गेल्या अनेक महिन्यांपासून एक हिलर, रेकी हिलर, एंजल थेरपिस्ट म्हणून समाजाला सेवा देत असून ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. यामुळेच त्यांची सीताज्योतिष भास्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी प्रख्यात ज्योतिषी डॉ.एस.एच. रावत आणि दिनेश गुरुजी यांनी नयन आंबेकर यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र प्रदान केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like