लॉटरीचे लागल्याचे महिलेस आमिष ; ५१ हजारांची फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत योगेश्वर नगरातील विवाहितेची ५१ हजार १५० रूपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश्वर नगरात राहणाऱ्या कांचन आसाराम मासरे (वय-२९) यांना २७ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल येऊन तुम्हाला २५ हजारांची लॉटरी लागल्याचे सांगून व्हाट्सअपवर त्यांच्या कंपनीचे पॉंप्लेट टाकल्याचे सांगत त्यावर केबीसी असे नाव दिल्याने महिलेचा यावर विश्वास बसल्यानेत्यांनी वेळोवेळी एकुण ५१ हजार १५० रूपये ऑनलाईन टाकले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिले शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like