स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन निर्णयाचा प्रहार संघटनेकडून जल्लोष

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | माजी राज्यमंत्री तथा. .आमदार बच्चूभाऊ कडू यांनी गेली २० ते २५ वर्षांपासून केलेली मागणी दि.९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,दादाभुसे, बच्चूभाऊ कडू व प्रहार संघटनेचे कार्यकारणी सोबत झालेल्या बैठकीत दिव्यांगांच्या विषयावर चर्चा करून भारतातील पाहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्टात स्थापन करून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आली .

या निर्णयाची अधिकृत घोषणा दि.३ डिसेंबर २०२२ जागतिक अपंग दिनी होणार असल्याने या निर्णयाचे स्वागतासाठी अमळनेर शहरात प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने ढोल ताश्यांच्या गजरात, फटाके फोडून , पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार , जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, प्रदिप सोनवणे, रविंद्र पाटील, दिनेश पाटील, भैय्या पाटील, नूरखान पठाण, प्रविण पाटील, ललिता पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, रंजू जैन, योगेश पाटील, हेमंत महाजन, हरिप्रसाद कापडे, अशोक न्हावी, अश्विनी पाटील, श्याम धनगर, संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like