पोलिस मित्र संघटनेच्या अध्यक्षपदी नीलेश अजमेरा
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | किनगाव ता. यावल येथील रहिवासी तथा जळगाव येथील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे पदाधिकारी नीलेश अजमेरा यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी ही निवड केली. संघटनेच्या माध्यमातून पोलिस प्रशासन व नागरिकांना मदत करणे, संघटनेेचे कार्य तळागाळात पोचविण्यासाठी प्रयत्न असतील, असे अजमेरा यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम