बोदवड तालुक्यात अवैध गावठी दारू उध्वस्थ
खान्देश लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या सूचनेप्रमाणे गावठी दारू विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी बोदवड पोलिसांनी शेलवड येथे गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे.
आज सकाळी ७.३० च्या सुमारास तालुक्यातील शेलवड शिवारातील कुरण तलावाजवळ जवळ आनंद गुलाब धुलकर (वय- ३५ रा.भिलवाडा, बोदवड) याच्या ताब्यातील ४ ड्रम कच्चे ८०० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर उकळते पक्के रसायन चालू भट्टी व ८० लिटर तयार हात भट्टी दारू वरील तयार दारूसह १३ हजाराचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला करत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (फ),(ब) क अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. ही कारवाई सहा पोलीस निरीक्षक अंकुश जाधव,पोलीस हवालदर अयुब तडवी,पोलीस नाईक गजानन काळे, संदीप वानखेडे,पोलीस अंमलदार दीपक पाटील,मुकेश पाटील,निखिल नारखेडे,भगवान पाटील, निलेश शिसोदे, सचिन चौधरी आदींनी केली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम