जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत दहावीच्या परीक्षेकरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | जळगाव शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मानसिक आरोग्य यांनी विद्यार्थ्यांनसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला. आयोजित कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनाने जगाची सगळी गणितं बदलून टाकली आहेत. शिक्षण क्षेत्राचाही त्याला अपवाद नाही. गेली दोन वर्षे ऑनलाइन पध्दतीने अभ्यास करणारे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी यंदा ऑफ लाइन पध्दतीने परीक्षा देण्यास सिद्ध झाले आहेत. नियमित लिहिण्याचा सराव जरी कमी पडत असला तरी हे विद्यार्थी नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढच्या पिढ्यांपुढे आदर्श निर्माण करणार्या विद्यार्थांना आत्मविश्वासाने पेपर्स कसे लिहावेत याचे मार्गदर्शन डॉ. कांचन नारखेडे (मानसोपचारतज्ज्ञ तथा कार्यक्रम अधिकारी) ज्योती पाटील (समुपदेशक), विनोद गडकर (मनोविकार परिचारक) यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना महामारी नंतर प्रथम प्रत्यक्ष माध्यमिक शालांत परिक्षेला सामोरे जाताना ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, वेळेचे नियोजन ,परिक्षेसाठी मानसिकता व शारीरिक आरोग्य यांची काळजी कशी घ्यावी. सदरील कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.बी.कोळी, कलाशिक्षक सतिष भोळे व शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक तायडे, चंदन खरे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम