सोने-चांदी ५४ हजाराच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजचा दर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | रशिया व युक्रेन यांच्यातील तणावामुळे गेल्या महिन्यापासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यात आता दोन आठवड्यापासून तर अधिकच वाढ होत असून सोमवारी तर सोने-चांदी उच्चांकीवर पोहचले आहे. जगभरात घडणाऱ्या अनेक घटना घडोमोडी या धातूच्या दरवाढीस कारणीभूत ठरताना दिसतात.सध्या देशात सोनं जवळपास 53,600 रुपये आणि चांदी 70,600 रुपयांवर आली आहे.

जळगाव सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने भावात मोठी वाढ झाली आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ९८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ८३० रुपये प्रति किलोने महागली आहे. त्यापूवी काल सोने ८१० रुपयाने तर १२८० रुपयाने महागली होती.
नऊ दिवसात सोने ३,००० रुपये प्रति तोळ्याने वधारले आहे. २६ फेब्रुवारी सोने ५०,७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात २८ फेब्रुवारी रोजी ८०० रुपयांची वाढ होऊन ते ५१,५०० रुपयांवर पोहचले होते.

आता पुन्हा युद्धामुळे सोने ५४ हजाराच्या जवळ पोहचले आहे. तसेच त्या वेळी चांदी ७७ हजारावर पोहचली होती. आता ती पुन्हा ७१ हजारांच्या पुढे गेली आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने गुंतवणुकीकडे ओघ वाढला आहे.देशात सोन्याचांदीचा भाव पुन्हा एकदा आपल्या विक्रमी पातळीच्या दिशेने वेगाने जात आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like