मुडी शिक्षण संस्था चालकांसह ११ जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | शिपायाच्या मृत्यू प्रकरणी अखेर अमळनेर तालुक्यातील मुडी येथील शिक्षण संस्थेतल्या संस्था चालकांसह ११ जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुडी येथील ग्रामशिक्षण मंडळाच्या सारबेटे येथील विद्यालयात तुषार भाऊराव देवरे (रा. सारबेटे) हे २०१३ साली अनुकंपा तत्वावर शिपाई या पदावर रूजू झाले होते. यानंतर त्यांची शिरूड येथील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली होती. ही बदली रद्द करण्यासाठी संस्थाचालकांकडून त्यांना १० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. यात त्यांनी दोन लाख रूपये भरून देखील देऊन संस्थाचालकांनी पैशांचा तगादा लावला होता. याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. यात त्यांनी तीन चिठ्ठया लिहून यासाठी संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, तुषार भाऊराव देवरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे प्र. अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील (शिरुड), कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील, कर्मचारी दिनेश वसंत पाटील, निवृत्त मुख्याध्यापक अनिल लोटन पाटील, सचिन संजीव काटे, शरद दयाराम शिंदे, रमेश विनायक पाटील आणि सचिव सुनील पंढरीनाथ पाटील (नाशिक) यांच्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like