डोहात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू
खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | पाय घसरून गिरणा नदीच्या डोहात पडल्याने पाण्यात बुडून तालुक्यातील आमोदा येथील ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजता उघडकीला आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उत्तम रामसिंग सूर्यवंशी (वय-६५)रा. आमोदा बु असे मयत वृध्दाचे नाव आहे.
उत्तम सूर्यवंशी हे शेती व गुरे चारण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता उत्तम सूर्यवंशी हे गुरे चारण्यासाठी घराबाहेर गेले. त्यांच्याच शेताच्या बाजूला असलेला गिरणा नदीपात्रातील गमऱ्या डोहात गुरे चारत असतांना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडाले. दरम्यान दोन दिवसानंतर शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.पोलीस उपनिरीक्षक सायकर पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम