आ.डॉ.तांबे यांनी घेतला बालकांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद !!

व्यस्तदिनक्रमातूनही आ डॉ. तांबे रमले बाल क्रिकेटमध्ये

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ९ एप्रिल २०२२ । जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा मनमिळावू स्वभाव आणि सहजतेने सर्वांमध्ये सामील होण्याची पद्धत याची अनोखी प्रचिती बालगोपाळांना आली असून गल्लीमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये जाऊन आमदार डॉ.तांबे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत या विद्यार्थ्यांची संवाद साधला.

राहुरी तालुक्यातील प्रवासादरम्यान बारागाव नांदूर येथे काही बालगोपाळ गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होते. यावेळी आमदार डॉ.तांबे यांनी आपली गाडी थांबवून या विद्यार्थ्यांशी संवाद साधत या लहानग्या मुलांमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी आमदार डॉ. तांबे यांनी हातात बॅट घेऊन चांगली फलंदाजी केली तर काही वेळाने गोलंदाजी ही केली. प्रत्यक्ष आमदार आपल्यामध्ये क्रिकेट खेळत आहेत. यावर या बालगोपाळांचा विश्‍वासही बसत नव्हता. काही वेळाने आमदार डॉ. तांबे यांनी या मुलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या आवडीनिवडी विचारून अभ्यास व परीक्षा बद्दल ही माहिती विचारली.

याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, मागील दोन वर्ष कोरोणामुळे सर्व विद्यार्थ्यांनी घरून ऑनलाईन अभ्यास केला. मात्र या सर्व काळामध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम, मोबाईल यामुळे मैदानी खेळ मागे पडले. मैदानी खेळ ही तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शाळांमधून मैदानी खेळ खेळले जावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. पालकांनीही आपल्या मुलांना मोबाईल पेक्षा मैदानावर पाठवा. कारण त्यामधून मन आणि बुद्धी तेज होते. त्याच प्रमाणे जय किंवा पराजय पचवण्याची ताकद निर्माण होते. याचबरोबर सांघिक भावना वाढीस लागून या मुलांमध्ये सकारात्मकता वाढते म्हणून यापुढील काळामध्ये सर्व पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल ऐवजी मैदानी खेळांना प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या व्यस्त दिनक्रमातून ही सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह दिव्यांग व अपंग मुलांसाठी असलेल्या संग्राम मूकबधिर शाळेत जाऊन आमदार डॉ.तांबे हे वेळोवळी लहान मुलांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करत असतात. यावेळी बारागाव नांदूर येथील ग्रामस्थांनी आमदार डॉ.तांबे यांचे स्वागत केले. सोशल माध्यमांवर ही नाशिक,नगर,धुळे,जळगाव व नंदुरबार या विविध जिल्ह्यांमधून ही आमदार डॉ.तांबे यांचे नेता नव्हे मित्र म्हणून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like