धुमस्टाईल मोबाईल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; दोघांना अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iरामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व शिव कॉलनी परिसरात दुचाकीवरून धुमस्टाईल मोबाईल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना बुधवारी २१ डिसेंबर रोजी दुपारी जामनेर तालुक्यातून अटक केली आहे. दोघांना रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शिवकॉलनी परिसरातून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपी हे जामनेर तालुक्यातील असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.त्यानुसान त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, संदीप साबळे, विजय पाटील, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, सचिन महाजन, किरण धनगर यांचे पथक तयार करुन बुधवारी २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ जामनेर शहरात रवाना केले होते. यापथकाने जबरी चोरी करणारे विशाल दिनकर सपकाळ (वय-२३, रा. शास्त्रीनगर, जामनेर), आकाश कडू आल्हाट (वय-२२, शिवाजीनगर, जामनेर) या दोघांना अटक केली आहे. त्यांनी त्यांचा साथीदार योगेश सोनार रा. जामनेर याच्या मदतीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like