अमळनेरात भरदिवसा चोरटयांनी मारला डल्ला ; ४ लाखांचा ऐवज घेऊन झाले ‘गुल’

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I अमळनेर शहरातील धुळे रस्त्यावरील भारत गॅस गोडाऊनच्या मागील बाजूला सर्वत्र नगर येथे राहणाऱ्या वकिलांच्या घरातून चोरटयांनी घरफोडी करीत ४ लाखांचा ऐवज चोरून चोरटे ‘गुल’ झाल्याची धक्कादायक घटना आज घडली .

ऍड. किशोर बागुल हे आज सकाळी १० वाजता त्यांच्या पत्नी सोबत ग्लोबल इंग्लिश स्कुल येथे त्यांच्या मुलाचा निकाल पाहण्याकरिता गेले होते. त्यानंतर ते ११ वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांना बेडरूम मधील कपाटातील काही सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यामुळे घरात काही तरी घडले असल्याची कल्पना आल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता घरातील मागील बाजूस असलेला दरवाजेच्या कडी कोंडा तुटलेला दिसला.तेव्हा चोरी झाल्याचे समजले असता यावेळी घरातील सुमारे 75 ग्रॅम वजनाचे सोने,10200(दहा हजार दोनशे रुपये रोख )असे एकूण 3,85,200 (तीन लाख पंच्याशी हजार दोनशे रुपयांची )चोरी झाल्याचे समजले.

यात 2,35,000 (दोन लाख पस्तीस हजार )किंमतीची एक सोन्याची 47 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 80,000 (ऐंशी हजार )किंमतीची एक सोन्याची 16 ग्रॅम वजनाची लहान पोत, 60,000 (साठ हजार )किंमतीची एक सोन्याची 12 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स ,10,200 रुपये रोख त्यात 500,100 दराच्या भारतीय चलनी नोटा असा एकूण 3,85,200 रुपयांची चोरी झाल्याची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात ऍड. किशोर बागुल यांच्या खबरीवरून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like