महाराष्ट्रातील १२ वीचे दोन पेपरमध्ये करण्यात आला बदल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | महाराष्ट्रातील १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महामंडळाने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ५ मार्चचे पेपर आता ५ एप्रिलला होणार आहेत.

२३ फेब्रुवारी रोजी प्रश्नपत्रिका एका ट्रकमधून नाशिकमार्गे पुण्याच्या दिशेने येत असताना या ट्रकला आग लागली. इयत्ता १२वीच्या प्रश्नपत्रिका बुधवारी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळं परीक्षा पुढे ढकलणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात १२वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. ‘प्रश्नपत्रिका जळाल्या तरी १२वीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४ मार्चपासूनच सुरू होईल’ अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

तर नियोजन केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र आता वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बारावीचे ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर हे आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार आहे. वेळापत्रकातील दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. राज्य मंडळातर्फे इयत्ता १२वीची परीक्षा येत्या ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य मंडळानं परराज्यातून प्रश्नपत्रिकांची छपाई करून घेतली. ‘प्रश्नपत्रिका जळाल्या तरी १२वीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४ मार्चपासूनच सुरू होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत निश्चिंत राहून केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रश्नपत्रिका पुन्हा छापून घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल’, असं शरद गोसावी यांनी म्हटलं.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like