पिंप्री येथे घरफोडी ; २ लाखांचा ऐवज लंपास

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ |एका घरातून २ लाख ३२ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्री येथील रहिवासी लोटू मुरलीधर पाटील यांच्या गुरुजी निवास येथे दि ५ रोजी भर दुपारी घरफोडीकरत अज्ञात चोरट्याने तब्बल २ लाख ३२ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोकड लंपास केले आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात लोटू मुरलीधर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम