महात्मा फुले जयंतीनिमित्त समता परिषद युवक आघाडीच्यावतीने रक्तदान शिबिर
खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ । क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अ.भा. महात्मा फुले समता परिषद युवक आघाडीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम महात्मा फुले समता परिषदेच्या युवक आघाडी व समता विचार फाउंडेशन तर्फे घेण्यात आला होता.
रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला शिबिरात ८० बॉटल रक्त संकलन करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व ५० हजार रूपयांचा विमा देण्यात आला. शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेविका सरिताताई नेरकर, अतिरिक्त आयुक्त वर्षा गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष नविदिता ताठे, प्रकाश पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, राजपूत करणी सेने चे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सिंग पाटील, ज्ञानेश्वर महाजन, रामु सैनी, गजानन महाजन, शुभम नेरकर, रूपाली नेरकर, अरूण चौधरी, नंदु पाटील, भारती काळे, कृष्णा महाजन, समता परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच विविध समाज व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देवून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम