अंडाभुर्जी विक्रेत्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली
खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | शहरातील मयूर हॉटेलसमोर अंडाभुर्जी विक्रेत्याला पैसे मागण्याच्या कारणावरून तीन जणांनी शिवीगाळ करून दारूची बाटली डोक्यावर फोडून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, ईश्वर संतोष साळुंखे (वय-४६, रा. दिनकर नगर, आसोदा रोड, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील मयूर हॉटेलसमोर त्यांचे अंडाभुर्जी विक्रीची गाडी असून सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पंकज ( पूर्ण नाव माहित नाही), जितू (पूर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे तीन जण त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. पैसे मागितल्यानंतर ईश्वर साळुंखे यांनी पैसे देण्यास नकार दिला, याचा राग आल्याने तिघांपैकी एकाने हातातील काचेची दारूची बाटली ईश्वर साळुंखे यांच्या डोक्यात टाकली, त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, ईश्वर साळुंखे यांनी दिलेल्या जबाबावरून तीन जणांविरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीसहेड कॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम