धावत्या रेल्वेतून पडल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू
खान्देश लाईव्ह | १३ नोव्हेंबर २०२२ | पत्नीसोबत चारधाम यात्रेसाठी निघालेल्या ७५ वर्षीय वृध्दाचा चावलखेडा-पाळधी दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किसन तातेराव गरुड (वय-७५, रा. मटकहाडा, जि. परभणी) असे मृत वृध्दाचे नाव आहे.
परभणी जिल्ह्यातील मटकहाडा येथील किसन गरुड हे चारधाम यात्रा करण्यासाठी निघाले होते. रेल्वेतून प्रवास करीत असतांना चावलखेडा-पाळधी अपलाईनवरील खांबा क्रमांक २२५/३५ दरम्यान, धावत्या रेल्वेतून वृद्ध किसन गरुड यांचा तोल जावून ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गजानन महाजन व शब्बीर अली सैय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली.आधारकार्डवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून घटनेची महिती दिली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता उशिरा त्यांचे कुटुंबिय जळगावात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध गरुड यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम