पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोबाईल हिसकावला
खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ |मित्रांशी मोबाईलवर संभाषण करून जात असताना एका विद्यार्थ्यांचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना आयटीआय जवळ घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील लासूर येथील विजयकांत कैलास कोळी हा विद्यार्थी केसीई महाविद्यालयात अभियांत्रीकीच्या दुसर्या वर्षाला शिक्षण घेत असून तो १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजयकांत हा आयटीआय कॉलेजरोडवर जेवण्यासाठी जात असतांना त्याला मित्राचा फोन आल्याने तो फोनवर बोलत चालत होता. याचवेळी मागून लाल रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वारांनी विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल हिसकावून त्याठिकणाहून त्यांनी पोबारा केला. तरुणाने पळत दुचाकीस्वारांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम