कासोदा गावात 25 वीजचोरांवर कारवाई 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात वीजचोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये मेन गल्ली व बाजारपट्यातील व्यावसायिक व घरगुती 107 वीज कनेक्शन चेक करण्यात आले. या मध्ये 25 मीटरमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले व ते मीटर टेस्टिंग साठी ताब्यात घेण्यात आले.

मीटर किती प्रमाणात कमी फिरते यावरून वीजचोरीच्या बिलाची आकारणी करण्यात येणार आहे.. तसेच वीजचोरीचे बिल तात्काळ न भरल्यास विद्युत कायदा २००३ अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम प्रभारीकार्यकारी अभियंता जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक अभियंता राहुल पाटील, प्रशांत महाजन, जयदिपसिंग पाटील, इच्छानंद पाटील, लक्ष्मी माने व कासोदा कक्षाचे सर्व जनमित्र यांनी यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली असून एरंडोल उपविभागांतर्गत सातत्याने वीजचोरीची कारवाई मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे नियमित वीजबिले भरणाऱ्या व अधिकृत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like