कांद्याच्या गोण्यांची वाहतूक करणारा ट्रक यावल येथे उलटला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १० एप्रिल २०२२ । कांदा भरून छत्तीसगड येथे जाणाऱ्या ट्रकचा यावल शहराबाहेरील वळणावर अपघात झाला असून यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकास किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला.

अधिक माहिती या की, चोपडा तालुक्यातील अडावद येथून कांदा भरून ट्रक (क्रमांक एमएच.१८-एए.५१५६) छत्तीसगडकडे रवाना झाला होता. शनिवारी सकाळी हा ट्रक यावल शहरातून भुसावळ मार्गे पुढे जात होता. यावल शहरातील भुसावळ नाक्याजवळील वळणावर या ट्रकचे नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली. ट्रक रस्त्यावर कलंडल्याने त्यातील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ट्रक चालकाने पर्यायी व्यवस्था करत कांद्याच्या गोण्या उचलून त्यात भरल्या.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like