चोपडा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर शहरातील बापूजी कॉम्प्लेक्स येथून चोपडा शहर पोलिसांनी पकडले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा शहर पोलीस थांचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यावरून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांच्या पथकातील पोलीस नाईक शिवाजी धुमाळ, पोलीस नाईक संतोष पारधी यांनी बापूजी कॉम्प्लेक्स येथून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीझेड ६५१७) व विना क्रमांकाची ट्रॉली ताब्यात घेतली. . याप्रकरणी पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कुंदन कोळी आणि काशिनाथकोळी दोन्ही रा. कोळंबा ता. चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संतोष पारधी तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम