रसलपूर येथे दुकान फोडले
खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | रावेर तालुक्यातील रसलपूर येथील योगेश्वर ट्रेडर्स दुकान फोडून चोरट्यांनी दोन हजारांची रोकड व आठ हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लंपास केले. ही घटना १५ ते १६ रोजी दरम्यान घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रसलपूर येथे निलेश उर्फ नंदू लक्ष्मण महाजन (४६, रसलपूर) यांचे योगेश्वर ट्रेडर्स नामक दुकान असून चोरट्यांनी १५ रोजी रात्री आठ वाज ते १६ रोजीच्या सकाळी आठ वाजेदरम्यान दुकान फोडून त्यातील दोन हजारांची रोकड व आठ हजार रुपये किंमतीची सीसीटीव्ही कॅमेरे लंपास केले. तपास नाईक जगदीश पाटील करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम