किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
जळगाव : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आय एन एस विक्रांत च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करून स्वतः खर्च केल्या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली.यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करत किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले.
यावेळी शिवसेना जळगाव लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, मनीषा पाटील, नीलू इंगळे, निता सांगोळे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, उद्योजक खुबचंद साहित्या, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरलकर नितीन सपके, मानसिंग सोनवणे, ललित धांडे, कोमेश सपकाळे, बाळा कंखरे, सुनील राणे, प्रशांत फाळके, किरण भावसार, शोएब खाटीक, मतीन सय्यद, जमीर नागोरी, इकबाल शेख, ऍड अभिजित रंधे, ऍड दर्शन चौधरी, विकास तायडे, संजय सांगळे, फरीद शेख, प्रकाश पाटील, संजय महाजन आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम