आ. किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा
खान्देश लाईव्ह | ३१ ऑक्टोबर २०२२ | भडगाव- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचा दि.1 नोहेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 30 रोजी तालुक्यातील बात्सर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक युवानेते राकेश पाटील यांनी केले . या स्पर्धेत अनेक तरुणांनी सहभाग घेतला. या वेळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय श्रावण पाटील (भुरा आप्पा),डॉ. प्रमोद पाटील, पि.ए पाटील विनोद पाटील, रघुनाथ पाटील, उत्तमराव पाटील,प्रभाकर पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या तरुणांना आकर्षित बक्षीस वितरण करण्यात आले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम