निसर्ग मित्र समिती तर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष दिनानिमिताने वलवाडीत अभिवादन
खान्देश लाईव्ह २०२२ । ०७ मे २०२२ । धुळे शहर -महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती तर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी वर्ष निमिताने दि ६ मे रोजी निसर्ग मित्र समिती च्या वलवाडी स्थित कार्यालयात राज्य महा सचिव संतोषराव आबा पाटील- यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला,यावेळी प्रमुख अतिथीं म्हणून निसर्ग मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे,जिल्हा अध्यक्ष तथा से नि उप शिक्षणाधिकारी डी बी पाटील,राज्य संघटक तथा जेष्ट पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी राज्य संघटक तथा से नि असिस्टंड कमीशनर प्रभाकर शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले,तर यावेळी निसर्ग मित्र समिती चे राज्य उपाध्यक्ष जेष्ट पत्रकार आदर्श शेतकरी सुभाषजी बिंदवाल व धुळे तालुका संपर्क प्रमुख तथा आदर्श शिक्षक कांतिलाल रोहीदास देवरे यांनी प्रत्येकी पाच पाच पाण्याचे जार निसर्ग मित्र समिती च्या कार्यालयास भेट दिलेत,तसेच शिरपूर तालुका अध्यक्ष से नि आदर्श मुख्याध्यापक सुनिल आत्माराम चव्हाण सर यांनी १००चहा साठी चहाचाी किटली १० लिटर चा जार भेट दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जय हिंद चे आदर्श शिक्षक प्रभाकर पवार यांनी केले,सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य आर ए पाटील-,आदर्श शिक्षक ईश्वर बैसाणे,जय हिंद चे पर्यवेक्षक शिवाजी बैसाणे,ध धुळे तालुका सचिव प्रा जयवंतराव भामरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बैसाणे,धुळे शहर प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन,कार्यालय प्रमुख निसर्ग अहिरे,अक्षय दादा पवार,आदींनी विशेष परिश्रम घेतले,सदर कार्यालयाला निसर्ग मित्र समिती चे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते,अशी माहीती निसर्ग मित्र समिती ने पत्रकॉन्वये दिली आहे,
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम