रविवारी युवासेनेची जिल्हास्तरीय बैठक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ०५ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यात होऊ घातलेल्या शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी, शिवसेना संपर्क प्रमुख श्री. संजयजी सावंत साहेब यांच्या आदेशाने, रविवार दि. ७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२ वा. सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) जळगाव येथे युवासेनेची महत्वाची जळगाव जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुजी भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षलजी माने, शिवसेना महानगरप्रमुख शरदजी तायडे, उपमहापौर कुलभूषणजी पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यासह युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराजजी कावडीया व युवासेना विस्तारक किशोरजी भोसले, चैजन्यजी बनसोडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

जळगाव व रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुका, विधानसभा येथील सर्व युवासेना पदाधिकारी, युवासैनिक यांनी बैठकीसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like