खान्देश लाईव्ह । ३ मे २०२२ । महाराष्ट्र दिना निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे समर्थ बहुउद्देशीय संस्थेला (जवखेडे बुद्रूक , ता. एरंडोल) जिल्हा युवा पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महाराष्ट्र दिनी सन्मानित केले.
सदर पुरस्कारासाठी समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे रमेश जाधव, अध्यक्ष योगेश लांबोळे, कलावती भोई, उपाध्यक्ष महेश कोळी, सचिव विशाल जाधव, अमोल जाधव, रोहिणी निकम, अभिमन कोळी, विजय कोळी, भावेश पाटील, आदीचे विशेष सहकार्य लाभले.