संजय राऊत निर्दोष सुटतील का?; “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…” – छगन भुजबळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ४ ऑगस्ट २०२२ । शिवसेनेचे खा. संजय राऊत (Shiv Sena’s Sanjay Raut) यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली असून संजय राऊत यांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत (ED custody) राहावे लागणार आहे. ईडीने संजय राऊतांवर गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी कारवाई केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विचारले तेव्हा त्यांनी ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नसल्याचे म्हणत सूचक इशारा दिला. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग असून ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेले नाही. परंतु, अधिक तपासासाठी न्यायालयाने राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी.”

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment