अपघातात जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | दुचाकी समोर म्हैस अचानक आल्याने झालेल्या अपघातात ५० वर्षीय इसम गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रेमचंद खुशाल विजयवर्गीय-मारवाडी रा.मोरगाव, ता.रावेर असे मयताचे नाव आहे. पोकॉ गोकुळ तायडे तपास करीत आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment