ग्रामपंचायत निवडणुकीत माविआची आघाडी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | राज्यामधील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडले . या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून यात महा विकास आघाडीने आघाडी घेतली असून शिंदे गट आणि भाजप युती पिछाडीवर पडल्याचे प्रशथमिक चित्र दिसून येत आहे.

१८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

या ग्रामपंचायतींची होत आहे मतमोजणी

नंदुरबार: अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१

पुणे: मुळशी- १ व मावळ- १. सातारा: जावळी- ५ पाटण- ५व महाबळेश्वर- ५.

कोल्हापूर: भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा- १ व चंदगड- १ अमरावती: चिखलदरा- १. वाशीम: वाशीम- १. नागपूर: रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही-८ .वर्धा: वर्धा- २ व आर्वी- ७.चंद्रपूर: भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ४, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १. भंडारा: तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २ व साकोली- १. गोंदिया: देवरी- १, गोरेगाव- १ गोंदिया- १, सडक अर्जुनी- १व अर्जुनी मोर- २. गडचिरोली: चामोर्शी- २, आहेरी- २, धानोरा- ६ भामरागड-४, देसाईगंज- २, आरमोरी-२, एटापल्ली- २ व गडचिरोली- १

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment