१९ वर्षाआतील आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ नोव्हेंबर २०२२ | जिल्हास्तरीय आंतर शालेय १९ वर्ष आतील बुद्धिबळ स्पर्धेला कांताई सभागृहात सुरुवात झाली असून एकूण ९४ खेळाडूंचा सहभाग यात होता स्पर्धेतील प्रथम पाच आलेल्या मुला-मुलींची निवड विभागीय पातळी साठी करण्यात आली असून त्या विजयी दहा खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस जळगाव चे फारुक शेख यांच्यातर्फे सुवर्ण पदक देण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण* महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारूक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, व मुख्य पंच प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल मुले विनीत राजेंद्र बागुल, एस के पवार हायस्कूल, नगरदेवळा सार्थक विजय जाधव, के आर कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगावदर्शन रतिलाल गायकवाड, जय योगेश्वर कॉलेज अमळनेरपुष्कर प्रशांत चौधरी, डी. एस. हायस्कूल, भुसावळ तन्मय अनिल पाटील, आर. जी. एस.व्ही कॉलेज धरणगावअंतिम निकाल मुलीवैभवी सुनील चौधरी, एस एस कॉलेज धरणगावदीक्षा विनीत जमदाडे, एम. एम. कॉलेज पाचोराआशु रामकिशन वर्मा रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल जळगाव सविता सुभाष चौधरी एएससी कॉलेज चोपडा आरोही दाशराज कोल्हे.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment