अनुभूतीचा तिस·या नेत्राने जगाकडे डोळसपणे पहायला शिकविले.- अमर वाडोदे

बातमी शेअर करा

ब्रह्माकुमारीज विद्यालयात ब्रेल दिवस साजरा

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । स्थूल नेत्र नसल्याची जाणीव जगाने करुन दिली परंतु अनुभूतीच्या तिस·या नेत्राने जगाकडे डोळसपणे पहाता आले असे प्रतिपादन अमर वाडोदे यांनी विश्व ब्रेल दिवस कार्यक्रमात केले.

ब्रह्माकुमारीज् विद्यालयात जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी दिव्यचक्षू अमर वाडोदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. पुर्वी पेक्षा आता दिव्यचक्षूंकडे पाहण्याच्या दृष्टीकोण बदलेला आहे. फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ लई ब्रेल यांच्या प्रयत्नाने आम्हांस शिक्षण घेता आले, आता बहुंताश बाबी ब्रेल लिपी मध्ये होत असल्याने आम्हीही कुठे कमी पडत नाही हा आत्मविश्वास दुणावतो. दिपस्तंभ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मला खुप मदत झाली. त्याचबरोबर ब्रह्माकुमारीज् राजयोगाच्या अभ्यासाने अनुभूतीचे विश्व समृद्ध झाले. पुर्वी मी लवकर निराश, हताश होत होतो परंतु राजयोगाने आत्मविश्वास वाढविण्यास मदत झाली आणि स्थूल नेत्र नसले तरीही अनुभूतीच्या नेत्राने आम्ही समाजाकडे डोळसपणे पाहायला लागलो. याप्रसंगी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, वर्षादीदी यांच्या हस्ते अमर वाडोदे यांचा सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment