खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | येथील रामदास कॉलनी परिसरात अज्ञात व्यक्तींनी दोन कारला आग लावून दिल्याची घटना १८ रोजी मध्यरात्री घडली असून याघटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शहरातील रामदास कॉलनीत यश जतीन गांधी राहत असून त्यांच्याकडे (एमएच १९ सीयू ७३४८) क्रमांकाची कार आहे. सोमवारी १७ ऑक्टोबर रेाजी रात्रीच्या सुमारास त्यांनी कार घराच्या कंपाऊंड मध्ये लावली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारला आग लावून ते घटनास्थळाहून पसार झाले. यश गांधीयांच्या आई पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठल्या असता, त्यांना कार जळतांना दिसून आली. त्यांनी आपल्याला मुलाला उठवित घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ पाण्याचा मारा करुन आग विझविली. माथेफिरुंनी प्रभात कॉलनीत राहणारे महिपाल बोहरा यांची (एमएच १९ सीयू १९३९) क्रमांकाच्या कार देखील जाळून टाकल्याचे उघडकीस आले. यश गांधी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.