स्विमींग सर्टिफिकेट कोर्स मध्ये अमोघ कुरकुरे ‘ए’ ग्रेड मिळवून सर्वप्रथम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ एप्रिल २०२२ | मुळचा धुळेकर असलेला अमोघ विवेक कुरकुरे या अवघ्या २१ वर्ष वयाच्या तरुणाने पोहण्याच्या स्पर्धेत अनेक विक्रम मोडले असून त्याने नुकतेच पाटियाला येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोटर्सने भारतातून सहा आठवड्याच्या स्विमिंग सर्टिफिकेट कोर्ससाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यातून देशभरातून ७० मुलांची निवड करण्यात आली होती. बंगलोर येथील साई (स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ला घेण्यात आलेल्या या सहा आठवड्याच्या स्विमिंग कोर्समध्ये अमोघने ३०० पैकी २३३ गुण ‘ए’ ग्रेड मिळवून देशभरातून निवड झालेल्या ७० स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

अमोघने पोहण्याच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे पटकाविली असून अरबी समुद्रातील मोराजेट्टी ते कासा बंदर हे १७ कि.मी. अंतर ब्रेस स्ट्रोट मध्ये पोहून त्याने कमी वयात रेकॉर्ड केले होते. अमोघ विवेक कुरकुरे हा धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक, विचारवंत कै. ल.भा. कुरकुरे व समाजवादी महिला सभेच्या एकेकाळच्या ज्येष्ठ मार्गदर्शक उर्मिला कुरकुरे यांचा नातू असून प्रा. नरेंद्र कुरकुरे व प्राध्यापिका डॉ. प्रिया कुरकुरे यांचा पुतण्या आहे. विरार येथील प्राध्यापक विवेक कुरकुरे व विरार मनपाच्या माजी नगरसेविका सौ. सुरेखा कुरकुरे यांचा सुपुत्र आहे. काल अमोघ धुळे येथे आला असता एका छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांच्या हस्ते कुरकुरे परिवाराच्या वतीने अमोघचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. यावेळी अमोघची आजी श्रीमती उर्मिला कुरकुरे, काका प्रा. नरेंद्र कुरकुरे, काकु प्रा. डॉ. प्रिया कुरकुरे, वडील प्रा. विवेक कुरकुरे, आई माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment