गरजू रुग्णांसाठी १ ते ३० जानेवारीपर्यंत शस्त्रक्रिया अभियान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । इंग्रजी नववर्ष २०२३ ला सुरुवात झाली असून नविन वर्षाचा नविन संकल्प गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने केला आहे. १ ते ३० जानेवारी या कालावधीत शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले. यात कर्करोगासह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योेजनेंतर्गत केल्या जाणार आहे. गरजू रुग्णांना उपचाराची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या संकल्पनेतून महाशस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानासाठी रुग्णालयात सर्जन्स, भुलरोग तज्ञ, प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ यांची टिम सज्ज झाली आहे. रुग्णालयातील ११०० बेड हे रुग्णांच्या सेवेत असून पुरुषांसह महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड, स्पेशल रुम, डिलक्स रुमची व्यवस्था आहे. सर्जिकल आयसीयू, मेडिसीन आयसीयू, पीआयसीयू आणि एनआयसीयू येथे असून तज्ञ डॉक्टर येथे २४ तास कार्यरत असतात. नवजात शिशूंसह वयोवृद्ध रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालय सज्ज असून मोफत उपचार आणि योग्य समुपदेशन येथे दिले जाते. तरी या महाशस्त्रक्रिया शिबिरात सहभागी होवून व्याधीमुक्‍त व्हावे असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेसह प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, इएसआयसी, कॅशलेस सेवांद्वारे ही उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आशिष भिरुड ९३७३३५०००९, रत्नशेखर जैन ७०३०५७११११ यांच्याशी संपर्क साधावा.

या आजारांवर उपचार उपलब्ध
शस्त्रक्रिया अभियानात युरो सर्जरी, न्यूरो सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, स्पाईन सर्जरी, कान नाक घसा सर्जरी केल्या जातील. तसेच जनरल मेडिसीन विभागांतर्गत किडनीचे आजार, क्षयरोग, लकवा, टिबी, थॅलेसेमिया, फिट्स, डायबेटीजमुळे होणारी गुंतागुंत, दारुमुळे उद्भवणारे विकार तसेच हृदयविकारी रुग्णांसाठी टू डी इको, एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टीची सुविधाही उपलब्ध आहे. रुग्णांनी अभियानात सहभागी होवून लाभ घ्यावा.

२०२३ हे वर्ष सर्वांनाच आनंदाचे, सुख समाधानाचे, भरभराटीचे जावो या शुभेच्छा देतो. जानेवारी महिन्यात होत असलेल्या महाशस्त्रक्रिया अभियानाद्वारे व्याधीमुक्‍त समाजाकडे वाटचाल करण्यासाठी रुग्णालयाने पाऊल टाकले आहे. विकारग्रस्त रुग्णांसाठी शस्त्रक्रिया अभियान फार महत्वपूर्ण ठरणार आहे.
डॉ.उल्हास पाटील, अध्यक्ष,
गोदावरी फाऊंडेशन

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment