खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I व्हिडीओ कॉलवर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव शहर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सादखान अय्युबखान (वय १९, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सादखान अय्युबखान हा दि. २५ नोव्हेंबर पासून तर आजपर्यंत १५ वर्षीय पिडीत मुलगी शाळेत जातांना तिचा सतत पाठलाग करुन अश्लिल इशारे करत होता. तसेच पिडीत मुलीच्य मोबाईलवर व्हिडीओ कॉल करुन अश्लिल कृत्य करण्यास दबाव टाकुन लज्जा वाटेल अशा रितिने तिच्याशी वागला. तसेच सादखान याने पिडीते च्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत फोनद्वारे,प्रत्यक्ष पाठलाग करुन त्रास देत होता .या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून सादखान अय्युबखान यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहेत.