रावेर तालुक्यात अल्युमिनियमचे तार चोरट्याना पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | जळगावात रावेर तालुक्यातील अल्युमिनियमचे तार चोरी करणाऱ्या सात संशयितांच्या निंभोरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्याच्या ताब्यातील गाडी व तारांचे बंडल असे ४ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

रावेर तालुक्यातील खिर्डी येथून जवळच असलेल्या निंभोरा पोलीस स्टेशनचे पोहेका विलास झांबरे हे ९ मार्च रोजी १२ वाजता रात्री गस्तवर होते. त्यामुळे बलवाडी ते तांदलवाडी रोडवर असलेल्या सिंगत गावाच्या पुढे त्यांना टाटा कंपनीची ( MH19 CY 7714) क्रं. मालवाहू गाडी संशयास्पद स्थितीत रोडवर निदर्शनास आली. संशय आल्याने गाडी चालकास विचारपूस केली. चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा संशय अधिकच बळावल्याने त्यांनी सपोनि गणेश धुमाळ व पोलिस नाईक, ईश्वर चव्हाण यांना कळविले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गाडी चालक जितेंद्र शांताराम पवार यांनी सांगितले की, बंटी भिल, आकाश पाटील, लखन पाटील, समाधान गुजर, दिनेश गुजर, जितेंद्र पाटील ( सर्व रा.शिंदी ता.भुसावळ ) येथील असून अल्युमिनियमचे तार चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. दरम्यान गाडी मध्ये ६० हजार रू किमतीचे अल्युमिनियम तारांचे बंडल आढळून आले. या प्रकरणी नीभोंरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर चव्हाण करीत आहेत.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment