१० मार्चनंतर पेट्रोल डिझेलचा उडणार भडका

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल केले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. वाढणारे पेट्रोल डिझेलचे भाव हे त्यांच्या आर्थिक बजेट साठी एकप्रकारे त्रासदायक ठरतात.सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत.

तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 9 रुपयांनी वाढवू शकतात. आता 7 मार्चला निवडणुकांची सांगता आणि 10 मार्चला निकाल लागल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती लोकांमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीने १४ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना धक्का बसू शकतो.देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. 3 महिन्यांपासून सरकारी तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. मंगळवारी देशभरातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महानगरांमध्ये, मुंबईत पेट्रोल सर्वात महाग आहे. १०९.९८ रुपये आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त आहे ९५.४१ रुपये. त्याचवेळी भापाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल १०० च्या पुढे आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment