खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | एका ४६ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठ पोस्ट गल्लीत घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. रमेश लक्ष्मण वानेरे असे मयताचे नाव आहे.
आपल्या राहत्या घरात छताला दोरी बांधून वानेरे यांनी गळफास घेतला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पोलिस नाईक विशाल मोहे पुढील तपास करीत आहे.