खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | धावत्या रेल्वेखाली एकाने आत्महत्या केल्याची घटनारविवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता म्हसावद ते बोरनार दरम्यान असलेल्या रेल्वेलाईनवर घडली होती . राजेंद्र पंडीत पाथरवट (वय-५५, रा. पाथरी ता. जळगाव) असे त्यांचे नाव आहे.
रविंद्र पाथरवट हे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होते. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घरात कोणाला काहीही एक न सांगता घरातून निघुन गेले. शनिवारी म्हसावद ते बोरनार दरम्यान डाऊनलाईनवरील खांबा क्रमांक ३९७/१७ ते १९ दरम्यान अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.