भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ |भूमि अभिलेख विभागातील गट क ( भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 9 डिसेंबर, 2022 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती.

त्यानुसार 9 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर सदर अर्जदार यांना विभागाकडून दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 ते 13 मार्च, 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमी अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील 4 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परिक्षा (Computer Based Test ) दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा दयावयाची आहे.

परीक्षा पध्दतीबाबची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक देखील 14 नोव्हेंबर, 2022 पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. असे आवाहन प्र. उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक महेशकुार शिंदे यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment