जळगावसह राज्यातील इतर विमानतळांच्या विस्तार आणि प्रश्नांवर ज्योतिरादित्य सिंधियाचे आश्वासन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या विकासासंबंधी व विमानसेवांच्या विस्तारासंबंधी राज्यात सध्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या विमानतळांसह जळगाव, सोलापूरसारख्या नव्याने विकसित झालेल्या विमानतळांवरील सेवांच्या विस्तारी करणाबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना साकडे घातले.

विविध विमानतळांच्या विकास व सेवांच्या विस्ताराबाबत नागरी उड्डाण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करू, असे आश्‍वासन मंत्री सिंधिया यांनी यावेळी दिले.

‘असोचेम’ या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित हवाई वाहतूक परिषदेप्रसंगी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी सिंधिया यांची भेट घेऊन चर्चा केली, प्रसंगी त्यांनी हे आश्‍वासन दिले. राज्यातील विमानतळांबाबत आणि त्यांच्या विकासासबंधी लवकरच यावर बैठका घेतल्या जातील असे आश्वासन त्यावेळी दिले.

ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विमानतळांचा विस्तार, हवाई सेवांचा विस्तार, प्रस्तावित विमानतळांची प्रलंबित कामे या विषयांची माहिती शिंदे यांना देऊन राज्यातील विमानतळांविषयीचे सविस्तर निवेदन सादर केले. कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपुर येथुन नवीन हवाई सेवांचा प्रारंभ, विमानतळ विस्तारीकरण यावर प्राधान्याने लक्ष देण्याची विनंतीही केली.

सोलापूर विमानतळावरील प्रवासी वाहतुक नियमित सुरू होण्यामधील अडथळे दूर करणे, पुणे मुंबई येथील नवीन विमानतळांच्या कामाची गती वाढविणे, अमरावती, अकोला, रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणे या प्रश्नांवर मुख्यतः लक्ष केंद्रीत अशी विनंती गांधी यांनी शिंदे यांना केली.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment