जय हनुमान भक्तपरिवार स्वखर्चाने करणार रांजणगाव हनुमान मंदिराचे नूतनीकरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ मार्च २०२२ | जळगावातील चाळीसगाव शहरातील रांजणगाव दरवाजा टाऊन हॉल येथे संकट मोचक हनुमानाचे मंदिर नुतनीकरण जय हनुमान भक्तपरिवार स्वखर्चाने करणार आहेत.

चाळीसगाव शहरातील रांजणगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून स्थापित असलेले या हनुमान मंदिरावर कळस नाही. आणि या मंदिराचे बांधकाम देखील जुने झालेले आहे. त्यामुळे या मंदिराचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. तर सदर मंदिरावर ट्रस्टचा हातभार नसल्यामुळे मंदिराचे नुतनीकरण आणि कळसाचे बांधकाम करण्यासाठी तेथील स्थानिक जय हनुमान भक्त परिवाराने पुढाकार घेतला. या मंदिराचे कळसाचे आणि नूतनीकरणाचे बांधकाम सदर भक्तपरिवार स्वखर्चाने करणार आहेत.

जय हनुमान भक्त परिवार व जय बाबाजी भक्त परिवार पाटणादेवी नाका यांनी सदर हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत चाळीसगावचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी निवेदनकर्त्यांना हनुमान मंदिराच्या परवानगीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment